Fri. Apr 23rd, 2021

धामना धरणालाही तडे!

चिपळूणचं तिवरे धरण फुटल्याची घटना ताजी असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या धामना धरणाला तडे जाऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे..

सध्या राज्यात मान्सून चा जोर वाढत आहे अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक धारणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. त्यापैकीच एक भोकरदन तालुक्यातलं धामना धरण आणि मोठ्या प्रमाणात या धरणात पाणी आल्याने या धरणाला तडे गेले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. या सर्व परिस्थितीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी केली आणि अत्यावश्यक उपाययोजना राबण्याच्या सूचना प्रशांसनाला दिल्या आहेत. तर या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे..

या धरण परिसरात 2 जुलैपासून मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात धरणात पाणीसाठा झाला.

धरण भरल्याने निकामी झालेल्या धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने आसपासच्या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

1972 मध्य या धामना धरणाची निर्मिती करण्यात आली होती..मात्र आतापर्यंत या धरणाची डागडुगी करण्यात आली नसल्याचंही उघड झालं आहे.

2006 मध्ये हे धरण ओव्हर फ्लो झालं होतं.

त्यानंतर आता हे धरण पुन्हा भरलं असून आता त्याच्या सांडव्याच्या भिंतीलाच तडे गेल्याने धरण फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुण्यात आणि मुंबईत पावसामुळे भिंत कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला त्यातच चिपळूणचे तिवरे धरण फुटून अनेक गाव पाण्याखाली गेली पावसामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती नैसर्गिक आपत्ती असली तरी राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या नाकर्त्या धोरणामुळे आणि ढिसाळ कारभारामुळे आणखी किती लोकांचे बळी जाणार हाच मोठा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *