Fri. Apr 23rd, 2021

आचारसंहिता लागल्यावर कारवाई का ? धनंजय मुंडेंचा सरकारला प्रश्न

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर जाणार असल्यामुळे EDला मुंबईत नसल्याचे वाटू नये म्हणून आज शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडीने चौकशीसाठी पवारांना समन्स बजावलेले नसल्याने प्रवेश नाकारण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये तसेच गर्दीही करू नये असे आवाहान शरद पवारांनी दिले होते. शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक बंगल्यावर दिग्गज नेते उपस्थित झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर कारवाई का ? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. 

काय म्हणाले धनजंय मुंडे ?

धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या मुंबईतील  सिलव्हर ओक बंगल्यावर भेट दिली आहे.

यावेळी मुंडेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज असल्याचे मुंडे म्हणाले.

कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ईडी आणि पोलिसांची असल्याचे मुंडे म्हणाले.

नाव नसतानाही पवारांवर गुन्हा दाखल कसा केला ? असा प्रश्नही उपस्थित केला.

देशात लोकशाही राहीली की नाही ? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

जनता शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे मुंडे म्हणाले.

पोलीस सहआयुक्त शरद पवारांच्या भेटीला –

पोलीस सहआयुक्त विनय चौबे यांनी शरद पवारांची भेट घेतली.

ईडी कार्यालयात न जाण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *