जेव्हा धोनीला राग येतो तेव्हा…
२० धावांनी चेन्नई सुपर किंग्सचा विजय…

आयपीएलमध्ये अनेक सामने होतात मात्र चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा फार रंगतदार असतो.
चेन्नई सुपरकिंग्ज टीम ही सर्वात लोकप्रिय टीम असल्यानं चाहत्यांना या टीमचा पराभव सहन होत नाही.
चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या १३ व्या हंगामात अनेक वेळा पराभवाचा सामाना करावा लागला. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना रोमांचक होता.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हैदराबाद मैदानावर होती शेवटी या सामन्यात २० धावांनी चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला. हा विजय मिळवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स ही सहाव्या स्थानावर येऊन पोहोचली आहे.
या सामन्यात हैदराबादला विजयासाठी १६७ धावा हव्या होत्या. मात्र केन विल्यमसनचा अपवाद वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही.
विल्यम मैदानावर असल्यानं हैदराबाद जिंकेल अशी शक्यता होती मात्र त्यानंतर धोनीने सामन्यातलं १८ वं षटक टाकण्याची संधी शर्माला दिली त्यानंतर पहिल्या बॉलवर शर्माने चौकार मारण्याची संधी विल्यमला दिली मात्र त्यानंतर विल्यमला बाद केलं.
हा सामना आणखी रंगला जेव्हा शर्माच्या उर्वरित ४ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षटकार लागल्यानं चेन्नई सुपर किंग्स ही दबावात आली. यामुळे धोनी हा नाराज झाला. धोनीने मैदानातच कर्ण शर्माला कानपिचक्या दिल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सजने तिसरा विजय प्राप्त केला.
हैदराबादच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली मात्र फार काळानंतर चाहत्यांना धोनीच एक वेगळ अवतार मैदानात बघायला मिळालं.