अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली
दियाच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो…

अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईमध्ये नातेवाई आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दियाचा लग्नसोहळा पार पडला. दिया मिर्झाने उद्योगपती वैभव रेखीसोबत दियानं लग्नगाठ बांधली आहे.
सोशल मीडियावर दियाने लग्नाचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. दियाने नव्या कुटुंबात सामील होताना आनंद होतो असल्याची भावना दियानं सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. लाल रंगाच्या बनारसी साडीमध्ये दिया शोभून दिसत आहे. तर पती वैभव रेखीनं लग्नासाठी पांढऱ्या शेरवानीची निवड केली. लग्नासाठी भरपूर दागिने न घालता अगदी मोजके पण सुबक दागिने घालणं दियानं पसंत केल्याच दिसून येत आहे.
लाल रंगाच्या बनारसी साडीमध्ये दिया शोभून दिसत आहे. लाल रंगाच्या बनारसी साडीमध्ये दिया शोभून दिसत आहे. दियाप्रमाणेच वैभव रेखीचं देखील हे दुसरं लग्न आहे. लग्नानंतर काही वर्षातच वैभव रेखीं पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले. वैभव रेखी यांना एक मुलगी देखील आहे. 2019 मध्ये दिया मिर्झानं पती साहिल संघा यांना घटस्फोट दिला. त्यानंतर वैभव रेखी यांच्यासोबत दियाची मैत्री झाली आणि आता वैभवसोबत लग्नबेडीत अडकल्यानंतर दियाने आनंद व्यक्त केला आहे.