कचराकुंडीच्या तुटवड्यामुळे वसई विरारमध्ये घाणीेचे साम्राज्य

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अहवालानुसार वसई विरार महानगरपालिका ही नवव्या क्रमांकावर आहे. मात्र असं असून देखील वसई विरार महानगरपालिका शहरातील कमालीच्या अस्वच्छतेमुळे घसरली आहे.
गेल्या एक वर्षांपासून पालिकेकडे नवीन कचऱ्याचे डब्बे उपलब्ध नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यातून महापालिकाच शहराला अस्वच्छ करण्यात हातभार लावत असल्याचे चित्र दिसत आहे.
तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या महासभेत नवीन डब्यांसाठी मंजुरी मिळाली असली तरीही अद्याप नागरिकांच्या सोयीसाठी नवीन डबे उपलब्ध झाले नाही.
यामुळे महापालिका वसईकरांच्या आरोग्याबाबत खरंच गंभीर आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच महापालिकेच्या अशा कामाबद्दल वसई विरारमधील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.