भारतात ‘कोव्हिशील्ड’ या लस वितरीत फेब्रुवारीपासून
‘कोव्हिशील्ड’ या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल…

सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हिशील्ड’ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे.
या लसीच्या साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. पुनावाला यांच्यानुसार 50 ते 60 कोटी लशींची निर्मिती करण्यात येत आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंती ही क्षमता 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येईल,शिवाय कोरोनाच्या संकटातून कसं बाहेर पडता येईल आणि रुग्ण कसे लवकर बरे होतील याकडे लक्ष असणार आहे असं त्यांनी सांगितलं. आता कोविडशील्ड ही लस कसा रिजल्ट देईल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.