कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘या’ शहरात दारुविक्री राहणार बंद

कोरोनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. सुरक्षितेतचा उपाय म्हणून राज्यातील मॉल, जिम तसेच शाळा-महाविद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक आणि उपराजधानी असलेल्या पुणे आणि नागपुरात मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये मद्यविक्री बंद असणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
दरम्यान पुण्यात मंगल कार्यालयं बंद करण्या संदर्भातील लेखी आदेश काही अधिकाऱ्यांकडून काढण्यात आले आहेत. यामुळे अनेक नियोजित लग्नसोहळा पार पडणार की नाही, असा प्रश्न लग्न ठरलेल्यांना पडला आहे.
यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुणेकरांना पडलेल्या प्रश्नासंदर्भात खुलासा केला आहे.
काय म्हणाले नवलकिशोर राम ?
मंगल कार्यालयं बंद करण्याचे आदेश काढले असतील तर ते रद्द केली जातील. लग्न समारंभावर बंदी घातलेली नाही.
तसेच नागपुरात उपहारगृह, मद्यविक्री केंद्र आणि पान शॉप ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहे. यासंदर्भातील नागपुरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
राज्यात पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा ४२ इतका आहे. यापैकी १ रुग्णांचा मंगळवारी मुंबईत मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.