Mon. Jan 17th, 2022

दारू, चिल्लमच्या नशेत तरुण करायचा ‘या’ अजब गोष्टी!

उदयपूर येथे एका नशेबाज तरुणाच्या पोटाची सर्जरी करण्यात आली. त्यावेळी या तरुणाच्या पोटात चक्क चाव्या, नाणी, नेलकटर, अंगठ्या, क्लिप्स यांसारख्या 50 वस्तू आढळून आल्या. रुग्णाच्या पोटात या वस्तू पाहून डॉक्टरदेखील हैराण झाले. गजेंद्र असं या नशेबाज तरुणाचं नाव आहे.

पोटात चक्क या वस्तू!

उदयपूरच्या MB हॉस्पिटलमध्ये 24 वर्षीय गजेंद्र याच्या पोटाची सर्जरी करण्यात आली.

गजेंद्रचं 15 दिवसांपासून पोट दुखत होतं. तसंच उलट्या आणि जुलाब होत होते.

डॉक्टरांनी जेव्हा त्याचा X-ray काढला, तेव्हा त्यांना चक्क चाव्या, नाणी, नेलकटर, अंगठ्या, चिलीमचे तुकडे यांसारख्या गोष्टी दिसून आल्या.

हैराण झालेल्या डॉक्टरांनी गजेंद्रच्या पोटाची सर्जरी केली.

90 मिनिटं चाललेल्या या सर्जरीमध्ये तब्बल 50 वेगवेगळ्या वस्तू डॉक्टरांनी त्याच्या आतड्यातून बाहेर काढल्या.

दारू आणि चिलीम यांसारख्या नशा करणारा गजेंद्र मनोरूग्ण आहे.

नशेमध्ये गजेंद्र भूक लागल्यावर कोणत्याही वस्तू खाऊन टाकायचा.

अनेक टोकदार वस्तू तो गिळून टाकत होता. यामुळेच गजेंद्रला अल्सरदेखील होता. त्याचे X-ray आणि सीटीस्कॅन झाल्यावर त्याची एंडोस्कोपीही करण्यात आली. त्यातून त्याच्या पोटात असलेल्या 50 विविध अखाद्य वस्तू काढण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *