Sun. Mar 7th, 2021

कनिका कपूरच्या नखऱ्यांनी वैतागले डॉक्टर्स

आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कबूल केल्यानंतर कनिका कपूरला लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी लंडनहून येताना कोरोना तपासणी चुकवल्यामुळे कनिका कपूरवर टीका होत आहे. अशा अवस्थेत तिने पार्टी केल्यामुळे पार्टीमध्ये तिच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशामध्ये तिला रुग्णालयात दाखल केल्यावरही ती नखरे करत असल्याचा आरोप डॉक्टर्स करत आहेत.

PGI रुग्णलायाचे संचालक डॉ. आर. के. धीमान यांनी लेखी निवेदन देत कनिका कपूरची तक्रार केली आहे. कनिकाला या रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. मात्र इथेही ती रुग्णासारखी न वागता स्टारसारखीच नखरे करत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तिच्या वागण्यावर रुग्णालयातील कर्मचारी वर्गही त्रासून गेला आहे. तिला सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. तरीही तिचे नखरे सुरूच असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. याउलट आपल्याला डॉक्टर धमकावत असल्याचा आरोप कनिका कपूरने केला आहे.

कनिका कपूरची शुक्रवारी कोरोना चाचणी झाली तेव्हा ती पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तिनेच Instagram वर याबाबत स्पष्टीकरण दिलं. लंडनहून ती लखनौला परतली होती. मात्र त्यावेळी तिने ग्राऊंड स्टाफच्या मदतीने संधान साधत वॉशरूममधून लपत छपत कोरोना चाचणी चुकवत पळाली होती, असं सांगण्यात येतंय. ती त्यानंतर ३ पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे ती कोरोनाबाधित असल्याचं समजल्यावर तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली. लखनौमध्ये तिच्यावर ४ ठिकाणी गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *