अॅलोपॅथी डॉक्टरांचा आज देशव्यापी बंद
आज अॅलोपॅथी डॉक्टरांचा देशव्यापी बंद

आज अॅलोपॅथी डॉक्टरांचा आज देशव्यापी बंद पुकारला आहे. केंद्र सरकारने आयुर्वेद उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास दिलेली परवानगी मागे घेण्याच्या मागणीसाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने आज देशव्यापी बंद पुकारला आहे. आयुर्वेद हे केवळ कफ, वात, पित्त अशा मोजक्या आजारांवर उपचारासाठी असून याची तुलना आधुनिक वैद्यकशास्त्राशी करता येणार नाही, अशी भूमिका घेऊन ‘आयएमए’ने संबंधित अधिसूचना मागे घेण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी अमान्य करण्यात आल्याने अॅलोपॅथी डॉक्टरांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे.
सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत असणार हा बंद. मात्र आपत्कालीन सेवा सुरु राहणार आहेत. राज्यातील ४५ हजारांहून अधिक खासगी डॉक्टर त्यात सहभागी होतील, असे ‘आयएमए’ने म्हटलं आहे. या संपाला विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या ३४ संस्थांनी सक्रीय पाठिंबा दिल्याचेही ‘आयएमए’ने सांगितले आहे.