Fri. Mar 5th, 2021

‘मोदी महान नेते’, ट्रम्प यांची पल्टी

भारताला धमकी देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अवघ्या २४ तासांतच पल्टी मारली आहे. आता पुन्हा ट्रम्प यांनी मोदींचं गुणगान करायला सुरूवात केली आहे. नरेंद्र मोदी हे अत्यंत महान आणि चांगले नेते असल्याचं त्यांनी एका आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलला मुलाखत देताना म्हटलं. हायड्रोक्सीक्लोरिवीन गोळीवरच्या निर्बंधावरून ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली होती. त्यानंतर भारताने ताबडतोब हायड्रोक्सिक्लोरिविनसकट आणखी २४ औषधांवरील निर्यातबंदी उठवली. मोदींनी आपली भूमिका बदलल्यावर डोनल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोदींचं कौतुक करायला सुरुवात केली आहे आणि मोदी हे महान नेते असल्याचं म्हणत मोदींवर स्तुतीसुमनं उधळायला सुरूवात केली आहे.

कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी आपण २ कोटी ९० लाखांपेक्षा जास्त डोस खरेदी केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. याबद्दल मोदींशी आपण फोनवरून चर्चाही केली. या चर्चेनंतर मोदी यांनी अमेरिकेला सहकार्य करण्याची आपली भूमिका मांडली आणि हायड्रोक्सिक्लोरिविनसंदर्भात अमेरिकेला अडचण येणार नाही, असं आश्वासनही दिलं.  भारतातून  मुबलक औषध पुरवठा लागणार आहे. त्यासाठी या औषधांवरील निर्बंध तुम्ही हटवू शकता का, असं आपण मोदींना विचारलं होतं, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.  

अमेरिकेला भारताचं सहकार्य अपेक्षित आहे. कोरोनाचं संकट जगावर असताना अमेरिकेला भारताकडून मोठ्या प्रमाणावर औषधांची गरज आहे. मात्र या औषधांच्या निर्यातीवर भारताने कडक निर्बंध लादले आहेत. जर हे निर्बंध हटवले नाहीत, तर भारताला याचे गंभीर परिणाम भोगायला लागतील, अशा शब्दांत  ट्रम्प यांनी भारताला आधी धमकी दिली होती. मात्र त्यानंतर भारताने निर्यातबंदी उठवत अमेरिकेला औषधांचा पुरवठा ताबडतोब सुरू केला. त्यानंतर ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *