Jaimaharashtra news

डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला दिली भेट, केली सुतकताई

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत नरेंद्र मोदी उपस्थित होतं. यावेळस ट्रम्प दांपत्यांनी चरख्यावर सुतकताई केली.

चरखा चालवताना मोदी दांपत्य उत्साही दिसत होते.

तसेच यावेळी ट्रम्प यांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस अभिवादन केलं.

यावेळस साबरमती आश्रमातील नोंद वहित ट्रम्प यांनी अभिप्राय लिहिला.

यानंतर ट्रम्प मोटेरा स्टेडिअमच्या दिशेने रवाना झाले आहेत. मोटेरा स्टेडिअमचं ट्रम्प यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मोटेरा हे स्टेडिअम जगातील सर्वात मोठे स्टेडिअम असणार आहे.

या स्टेडिअमची १ लाख १० हजार इतकी क्षमता आहे.

मोटेरा स्टेडिअममध्ये लाखोंच्या संख्येने लोकं जमले आहेत. या स्टेडिअमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे.

या कार्यक्रमादरम्यान मोदी आणि ट्रम्प भाषण करणार आहेत.

Exit mobile version