Mon. Sep 27th, 2021

डोनाल्ड ट्रम्प २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून (२४ फेब्रुवारी ) २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्यासोबत त्यांचं कुटुंब देखील असणार आहे.

अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच स्वागत करणार आहेत.

ट्रम्प यांच अहदाबादमध्ये शंखनादानं स्वागत होणार आहे. अहमदाबाद विमातळापासून मोटेरा स्टेडिअमपर्यंत ट्रम्प यांचा २२ किमी रोड शो असणार आहे. या रोड शोमध्ये ५० हजाराहून अधिक जण सहभागी होणार आहेत.

विमानतळ ते मोटेरा स्टेडियम या मार्गादरम्यान ‘नमस्ते ट्रम्पचे’ बॅनर लावले आहेत.

ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. ११ हजार भारतीय जवान तैनात करण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडिअमचं उद्घाटन करणार आहेत. मोटेरा स्टेडिअम हे जगातील सर्वात मोठं स्टेडिअम आहे.

या मोटेरा स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातमी : भारत दौऱ्याआधी ट्रम्प यांचा ‘बाहुबली’ अवतार

१ कोटी १० लाख इतकी या स्टेडिअमची आसनव्यवस्था आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लोकनृत्याची मेजवानी देखील असणार आहे.

ट्रम्प दाम्पत्य १२.१५ वा. साबरमती गांधी आश्रमाला भेट घेणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आग्र्यातील ताजमहालला देखील भेट देणार आहेत.

ट्रम्प कुटुंबीय सोन्या-चांदी याचं वर्ख असलेल्या ताटात जेवणाचा आस्वाद घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *