Fri. Dec 3rd, 2021

मला ‘हिंदू जननायक’ म्हणू नका- राज ठाकरे

सध्या मराठवाडा दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरे यांनी आपल्याला ‘हिंदू जननायक’ म्हणू नये असं पत्रकारांशी चर्चा करताना स्पष्ट केलंय. ‘हिंदू जननायक’ ही उपाधी आपल्याला पक्षाकडून मिळालेली नसून एक न्यूज चॅनलने दिली असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हिंदुत्त्ववादी भूमिका?

मनसेच्या झेंड्यात बदल झाला असला, तरी भूमिकेत आपण कोणताही बदल केलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

तसंच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षांनी हिंदुत्वासंदर्भात कधी भूमिका घेतली का, असा सवाल करत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर नाव न घेता टीका केली.

औरंगाबादच्या नामकरणाचा शिवसेनेचा मुद्दा हायजॅक करत असल्याच्या आरोपांवरही राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. ‘औरंगाबाद’चं नाव बदललं तर हरकत काय आहे? चांगले बदल झाले पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार यांच्याशी संबंध चांगलेच

‘शरद पवार यांच्याशी तुमचे संबंध अजूनही चांगले आहेत का?’ या प्रश्नावर हसत राज ठाकरे यांनी माझे आणि शरद पवार यांचे संबंध चांगले असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *