Sun. Jul 5th, 2020

संकटाचा कुणी संधी म्हणून वापर करू नये, मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोरोना व्हायरसचं राज्यावर संकट आलं आहे. मात्र या संकटाचा कुणी संधी म्हणून वापर करू नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या संकटात कुणीही काळाबाजार करु नये, असं आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. बुधवारी व्हिडिओद्वारे मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी या भाषणात पुन्हा एकदा जनतेला सहकार्याचं आवाहन केलं आहे. तसंच केंद्र सरकारचे आभारदेखील मानले आहेत. ज्या प्रमाणे राज्या राज्यांमधल्या रेल्वे सेवा केंद्र सरकारने बंद केल्या आहेत. तसंच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची शेवटची तारीख ३१ मार्चपासून पुढे ढकलण्यात यावी, ही राज्य शासनाची विनंती केंद्र सरकारने मान्य केली आहे. याबद्दल ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

कोरोना व्हायरस जिथपर्यंत पोहोचलेला नाही, तिथे तो पोहोचू नये यासाठी उपाययोजना सरकारतर्फे करण्यात येत आहेत. शेतमालाची वाहतूक अद्याप थांबवण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *