डबल डेकर पूल नागपूरकरांच्या सेवेत
वर्धा मार्गावरील मेट्रोच्या डबल डेकर पुलाच अखेर लोकार्पण करण्यात आलं आहे

वर्धा मार्गावरील मेट्रोच्या डबल डेकर पुलाच अखेर लोकार्पण करण्यात आलं आहे. आजपासून डबल डेकर पूल नागपूरकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. देशातील एकमेव असलेल्या पुलाच्या सर्वात वरच्या टप्यात मेट्रो , मधल्या टप्यातून वाहनं तर सर्वात शेवटच्या स्तरातून अवजड वाहनांची वाहतूक होणार आहे.
नागपूर शहराच्या मध्य भागातून जाणार नॅशनल हायवे वर नेहमी होणारी वाहतुकीची समस्या सुटणार आहे. या पुलाच्या बांधकामकरिता 381 कोटी रुपये एनएचआयने दिले असून नितीन गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून देखील याला पाहिलं जातं आहे. सोबतच मनीष नगर रोड ओव्हर ब्रिजचं उदघाटन देखील या वेळी केलं जाणार आहे.