Fri. May 20th, 2022

डॉ. मनिषा कायंदे यांचा MIM खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल!

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज औरंगाबादेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मात्र याही वर्षी कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि MIM चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची गैरहजेरी होती. त्यामुळे या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे.

‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला खासदार इम्तियाज जलील आजही संभाजी नगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले, यावरून त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे वावडे असल्याचे दिसते,’ अशी टीका डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.


तसंच जलील यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

स्वतःला निजामाचे वारसदार समजणाऱ्या जलील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं त्या म्हणाल्या.

आधी आमदार आणि आता खासदार झाल्यावरही इम्तियाज जलील सातत्याने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत.

निजामाच्या जुलमांपासून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करणं जलील यांना मान्य नाही का?, असा सवाल मनीषा कायंदे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.