Sun. Nov 29th, 2020

अंबानी आणि मुख्यमंत्रिपदामुळे माझी अशी अवस्था – एकनाथ खडसे

उद्योगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आणि मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यानं आपली अशी अवस्था झाल्याचं वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सावदा येथे केले आहे.

एकनाथ खडसे यांचा अल्पसंख्याक समाजातर्फे नागरी सत्कार झाला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले एकनाथ खडसे ?

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी ना आवडता झालो.

एका मोठ्या व्यक्तीने मुस्लीम समाजाच्या जमिनीवर बांधलेले घर जमीनदोस्त करून ती जमीन सरकार जमा करण्याचा आदेश आपण दिला होता.

मात्र ती व्यक्ती दुसरे कुणी नव्हे तर अंबानी निघाले.

त्यांनी अनाथाश्रमाच्या जागेवर आपले निवासस्थान उभारले होते. वास्तविक, ती जमीन अल्पसंख्याक समाजाची असल्याने त्यांना मिळायला हवी होती.

अशा अनेक मोठ्या जमिनी सरकार जमा करण्याचा निर्णय आपण घेतला होता, मात्र काहींना तो निर्णय रुचला नाही.

या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्यावर आज ही वेळ आली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *