सरकारी कार्यालयात आता ड्रेसकोड लागू
सरकारी कार्यालयात ड्रेसकोड लागू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेसकोडबाबत नवे नियम ठरवले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना या ड्रेसकोडचं पालन करणं बंधनकारक राहणार आहे.
महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे. मंत्रालयात आता जिन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही. गडद रंगाचे चित्रविचित्र कपडे घालण्यास राज्य सरकारकडून मनाई घालण्यात आली आहे.
हे आहेत ड्रेसकोडचे नवे नियम
- महिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालावे.
- पुरूष कर्मचाऱ्यांनी शर्ट आणि पॅंट घालावी.
- जिन्स आणि टी शर्ट घालू नये.
- गडद आणि चित्रविचित्र कपडे घालू नयेत.
- शक्यतो चपला, बूट. सँडल्स वापराव्यात.
- कार्यालयात स्लिपर्सचा वापर करू नये.