Thu. Jan 20th, 2022

2020 या वर्षात ‘या’ दिवशी असणार ड्राय डे

ड्राय डेच्या दिवशी (कोरडा दिवस) अनेक तळीरामांची गैरसोय होते.त्यामुळे तळप भागवण्यासाठी अनेकदा जास्तीचे पैसे देऊन दारु घ्यावी लागते.

किंवा ड्राय डे च्या एक दिवसाआधी आधी स्टॉक घ्यावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी नववर्षात कोणत्या दिवशी ड्राय डे असणार आहे, याची माहिती या बातमीद्वारे तुम्हाला मिळणार आहे.

या नववर्षात अनेक दिवशी ड्राय डे असणार आहे.

ड्राय डे ची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. याआधी विविध सणांच्या दिवशी ड्राय डे नसायचा.

पण नव्या यादीनुसार नववर्षात अनेक दिवस ड्राय डे असतील.

२०२० वर्षात जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यात एकही ड्राय डे नसणार आहे.

२०२० या वर्षात या दिवशी असणार ड्राय डे

जानेवारी महिन्यात एकूण ३ दिवस कोरडा दिवस असणार आहे.

१५ जानेवारीला मकर संक्रांतीला हा कोरडा दिवस असणार आहे. २६ जानेवारीला ड्राय डे असणार आहे.

हा ड्राय डे रविवारी असल्याने तळीरामांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

यानंतर ३ दिवसांनी म्हणजेच ३० जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने कोरडा दिवस असणार आहे.

फेब्रुवारीत एकूण ४ दिवस ड्राय दिवस असणार आहे.

विशेष म्हणजे १८ आणि १९ फेब्रुवारी अशा सलग २ दिवस ड्राय डे असणार आहे.

गुरु रविदास जयंती, ९ फेब्रुवारी, रविवार.
स्वामी दयानंद सरस्वती जयंती, १८ फेब्रुवारी, मंगळवार.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, १९ फेब्रुवारी, बुधवार.
महाशिवरात्री, २१ फेब्रुवारी, शुक्रवार.

मार्च महिन्यात केवळ १ दिवस ड्राय डे असेल.

होळी, १० मार्च, मंगळवार.

एप्रिल महिन्यात ३ दिवस कोरडा दिवस

राम नवमी, २ एप्रिल, गुरुवार.
महावीर जयंती, ६ एप्रिल, सोमवार.
गुड फ्रायडे, १० एप्रिल, शुक्रवार.

मे महिन्यात 3 दिवस ड्राय डे

महाराष्ट्र दिन, १ मे.
बुद्ध पोर्णिमा, ७ मे, गुरुवार.
ईद उल फित्र, २५ मे, सोमवार.

जून महिन्यात एकही ड्राय डे नसेल.

जुलै महिन्यात २ कोरडे दिवस

आषाढी एकादशी, १ जुलै.
ईद, शुक्रवार, ३१ जुलै.

ऑगस्ट

जन्माष्टमी, १२ ऑगस्ट, बुधवार.
स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट, शनिवार.
मोहरम, २९ ऑगस्ट, मोहरम.

सप्टेंबर महिन्यातही कोरडा दिवस नसेल.

ऑक्टोबर महिन्यात ३ दिवस ड्राय डे

गांधी जयंती, २ ऑक्टोबर, शुक्रवार.
दसरा, २५ ऑक्टोबर, रविवार.
महर्षी वाल्मिकी जयंती, ३१ ऑक्टोबर, शनिवार.

नोव्हेंबर महिन्यात ४ दिवस ड्राय डे

दिवाळी, १४ नोव्हेंबर, शनिवार.
गुरु तेग बहादूर बलिदान दिवस, २४ नोव्हेंबर, मंगळवार.
कार्तिकी एकादशी, २५ नोव्हेंबर.
गुरु नानक जयंती, ३० नोव्हेंबर, सोमवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *