Fri. Feb 26th, 2021

कोरोनाची दहशत : ब्रिटनच्या महाराणीवर आली ‘ही’ वेळ!

Corona Virus ची दहशत जगभरात पसरली आहे. विविध देशांत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करावी लागली आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीपासून ते Hollywood चा दिग्गज अभिनेता टॉम हँक्स हे Corona च्या विळख्यात अडकल्यामुळे लोक संभ्रमित आहेत. कोरोनाचा धसका साक्षात इंग्लंडच्या राणीनेही घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय हिने आपला अलिशान राजमहाल सोडण्याची वेळ आली आहे.

बकिंगहम पॅलेस (Image: Alastair Grant/WPA Pool/Getty Images & Kirsty O’Connor/PA Wire)

बकिंगहम पॅलेस हे इंग्लंडच्या राजघराण्याचं शाही निवासस्थान. पण कोरोना तिथपर्यंतही पोहोचू शकतो. या भीतीने ब्रिटनची महाराणी Elizabeth II यांनी आपला शाही बकिंगहम पॅलेस काही दिवसांसाठी सोडला आहे. त्यांना आता विंडसर कॅसलला नेण्यात आलंय.

सगळेच लोक आता आपआपल्या पद्धतीने Corona पासून बचाव करण्यासाठी काळजी घेत आहेत. सध्या ब्रिटिश राजघराण्यात कुणालाही कोरोनाशी सामना करावा लागत नसला, तरी त्यापासून बचाव व्हावा यासाठी महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांनी आपलं निवासस्थान सोडण्याचं ठरवलं आहे. बकिंगहम पॅलेसमध्ये दररोज जगभरातून विविध मान्यवर राजघराण्याला भेटण्यासाठी येत असतात. कित्येक मान्यवरांचा दररोज बकिंगहम पॅलेसमध्ये पाहुणचार होत असतो.

बकिंगहम पॅलेसमध्ये जवळपास 500 लोक काम करतात. त्यामुळे Corona चा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. त्यामुळे सेंड्रिंगहम येथे वेगळं राहून Corona चा संसर्ग टाळता यावा यासाठी ही खबरदारी घेण्याचं शाही कुटुंबाने ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांच्या निवासाची पूर्ण तयारी Windsor Castle मध्ये करण्यात आली आहे.

विंडसर कॅसल

बकिंगहम पॅलेसमध्ये होणारे समारंभ, भोजन, पार्टी या सर्व गोष्टी आता रद्द करण्यात आल्या आहेत. विंडसर कॅसलमध्ये 100 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती येथे कमी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराणी आणि प्रिंस यांना Windsor Castle मध्ये ठेवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *