Tue. Mar 9th, 2021

कोरोनामुळे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद

कोरोना व्हायरसचा राज्यात आतापर्यंत एकूण ३९ लोक लोकांना पादुर्भाव झाला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात अनेक मंदिरं तसेच पर्यटन स्थळ देखील बंद ठेवण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी (Sanjay Gnadhi National Park ) राष्ट्रीय उद्यान देखील बंद ठेवण्यात येणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १७ मार्च ते ३१ मार्च अशा एकूण १४ दिवस बंद राहणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दररोज हजारो लोकं भेट देतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हे राष्ट्रीय उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनीतर्फे देण्यात आली आहे.

संजय गांधी नॅशनल पार्क एक आठवड्याकरिता बंद ठेवण्यात आलेला आहे. बोरीवली ते कान्हेरी गुंफा दरम्यान चालणारा बस मार्ग क्र (Bus route 188 Ltd suspended 188) १७ मार्च पासून दिनांक 22/03/2020 पर्यंत बंद करण्यात आले आहे.

दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद ठेवल्याने त्या मार्गावरील बेस्ट बसचा एक रुट बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती बेस्ट प्रशासनाने ट्विटद्वारे दिली आहे.

बोरिवली ते कान्हेरी गुंफा या मार्गावर धावणारी १८८ क्रमांकाची बससेवा आठवड्यासाठी म्हणजेच २२ मार्चपर्यंत बंद असणार आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्याच कोरोनाचे एकूण ३९ आहेत. नागरिकांना तब्येतीची काळजी घ्यावी, तसेच महत्वाचं काम असेल तरच प्रवास करावा, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे. पुढील १५ दिवस हे कोरोनाच्या दृष्टीने महत्वाचं असतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारतर्फे कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसू नये, यासाठी राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *