Fri. Apr 23rd, 2021

येत्या रविवारी सहा तासांचा ‘जम्बोब्लॉक’

येत्या रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील कल्याणचा 100 वर्षे जुना पत्री पूल पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी रविवारचा रेल्वे प्रवास कटकटीचा आणि त्रासाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे.

सुमारे लोकलच्या 140 फेऱ्या रद्द होणार असून, 40 मेल एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर याचा परिणाम होणार आहे.

  • सकाळी 8 ते 9.30 पासून ब्लॉकचे नियोजन केले जात आहे.
  • मुख्यत: ठाणे ते कल्याणदरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार
  • मुंबई ते नाशिक, मुंबई ते पुणेदरम्यानच्या मेल व एक्स्प्रेसचे वेळापत्रकही कोलमडणार
  • ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते डोंबिवली, कर्जत-कसारा ते कल्याणपर्यंत सेवा
  • प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काही विशेष लोकल फेऱ्याही चालविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *