Wed. Jan 19th, 2022

सांगलीत तब्बल १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे तब्बल १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पोलीसांनी जप्त केल्या आहेत. इस्लामपूर पोलिसांनी सापळा रचून या नोटा जप्त केल्या आहेत.या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलं आहे.या सर्व नोटा 500 च्या असल्याचेही पोलीसांनी सांगितले आहे. यापुर्वी ही सांगलीत बाजारपेठेत 500 आणि 1000 च्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. परंतु मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नोटाबंदी नंतर चलनातुन बंद झालेल्या तब्बल १ कोटीच्या जुन्या नोटा सांगलीच्या इस्लामपूर मध्ये सापडल्या आहेत.

शहरातील एसटी स्टँडनजीक छापा टाकत इस्लामपूर पोलीसांनी  सुमारे १ कोटीच्या नोटा जप्त केल्या आहेत.

यावेळी नोटा घेऊन आलेल्या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे तिघेजण वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड येथील असल्याचे तपासात शहीद झाले आहेत.

पोलिसांना खास सूत्रांकडून इस्लामपूर मध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी सापळा रचत तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९९ लाख ९७ हजार ५०० च्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात या नोटा कुठून आणल्या होत्या,

कोणाला देण्यात येणार  होत्या ,याबाबत आता इस्लामपूर पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *