Fri. Apr 23rd, 2021

BMC : ई-टेंडरिंग घोटाळ्यात पालिकेचे 63 अधिकारी दोषी

मुंबई महानगरपालिकेत 2014 मध्ये झालेल्या ई-टेंडरिंग घोटाळ्यात पालिकेचे 63 अधिकारी दोषी आढळले आहेत. याबाबत घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, म्हणून 2012 ते 2014 या कालावधीत ई-टेंडरिंग प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली. यावेळी 600 कोटी रुपयांची कामं ई-टेंडरिंगच्या माध्यमातून देण्यात आली होती. मात्र यात गैरव्यवहार झाल्याचं आढळून आलं होतं. यात एकूण 100 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झाले होते…

 

काय आहे हे नेमके प्रकरण?

ई-टेंडरिंग मध्ये निविदा भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत असते

या घोटाळ्यात एका रात्रीत निविदा भरणं बंद केलं होतं

यामुळे ठराविक कंत्राटदारांनी निविदा भरल्या

एकाच संगणकाहून निविदा भरणं खुलं केलं आणि त्याच संगणकावरून कंत्राटदाराने निविदा भरल्या

याप्रकरणात तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी चौकशी नेमली होती.

उपायुक्त अशोक खैरे, किशोर क्षीरसागर आणि आनंद वागराळकर यांच्या चौकशी समितीने आपला अहवाल विद्यमान आयुक्तांकडे सादर केला आहे.

यात चार अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

एकूण 63 अभियंते, अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग आहे.

मात्र महापालिकेचेच अधिकारी यात दोषी आढळल्याने विरोधकांची आता टीका सुरू झाली आहे.

त्याचबरोबर ज्या शिक्षेची तरतूद अहवालात केली आहे, ती योग्य नसून अधिक कडक कारवाईची मागणीही होत आहे.

तर दुसरीकडे केवळ हेच अधिकारी दोषी नाहीत तर इ-टेंडरिंगची संपूर्ण प्रक्रियाच दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

 

अशी होणार कारवाई?       

दोषींची वेतनवाढ रोखणार

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल

नऊ इंजिनीअरना निलंबित करण्यात आले असून 40 कंत्राटदारांना black list करण्यात येणार आहे.

 

कोण आहेत 63 जण?

कनिष्ठ अभियंता – 8

दुय्यम अभियंता – 37

सहाय्यक अभियंता – 1

कार्यकारी अभियंता – 16

सहाय्यक आयुक्त – 1

आयुक्तांकडे याबाबतचा चौकशी अहवाल सादर केला असून आता आयुक्त यावर कारवाई करतील मात्र या कारवाईन नंतर ई-टेंडरिंग मध्ये अशा प्रकारे होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा बसेल का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *