Fri. Jan 21st, 2022

एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. गिरीश चौधरी यांना मंगळवारी सकाळी ईडी कार्यालयात बोलविण्यात आले आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हा एकनाथ खडसे यांना हा मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता.

 

काय आहे प्रकरण?

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून खरेदी केली होती जमीन

२८ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आला होता व्यवहार

भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली

नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात व्यवहाराची रीतसर नोंद केली

एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *