Fri. Apr 23rd, 2021

पवरांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे बारामती बंदची हाक

काही दिवसांवर विधानसभा निवडणूक ठेपली असताना ईडीच्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंदची हाक दिली आहे.

सर्व कार्यकर्त्यांना सकाळी १० वाजताच्या सुमारास शारदा प्रांगणात येथे एकत्र येण्याचे आवाहन देण्यात आले असून याबाबत पुढचे पाऊल नंतर ठरवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे बारामतीत कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त झाल्यामुळे ही बंद हाक दिल्याचे समजते आहे.

त्याचबरोबर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सरकारचा निषेध करण्यासाठी बारामतीमध्ये बंद पुकारला असल्याचे समोर आले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *