ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजपा प्रदेश कार्यालय असल्याचं बॅनर लावले

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रीया उमटली आहे. शिवाय शिवसैनिकांकडून ईडी कार्यालयाबाहेर भाजपाचं बॅनर लावण्यात आलं. या बॅनरनंतर भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेरही ईडी कार्यालय असल्याचं बॅनर लावण्यात आलं आहे.
शिवसैनिकांनी काल (२८ डिसेंबर) ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजपा प्रदेश कार्यालय असल्याचं बॅनर लावलं होतं. असे बॅनर कोणी लावले हे आतापर्यत स्पष्ट झालं नाही आहे. मात्र शिवसैनिकांनी लावले असावे, असं बोललं जात आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘अमलबजावणी संचालनालय’ असं सुरूवातीलाच लिहिलं आहे.
त्यानंतर “येथे भाजपाविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात,” असं लिहिलेलं आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर असे बॅनर कार्यालयाबाहेर झळकले आहे. संजय राऊत यांनी देखील भाजपाला धारेवर धरलं आहे.