येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. इडीने शुक्रवारी रात्री हा छापा टाकला. तसेच राणा कपूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
छापा टाकल्यानंतर इडीने कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच कपूर यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली. यामुळे राणा कपूर यांना याप्रकरणातील चौकशी पूर्ण होईपर्यंत परदेशी जाता येणार नाही.
काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्जे थकीत झाली. त्यासाठी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे.
दरम्यान गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेने पैसे काढण्यावर निर्बंध लादण्यात आले. यामुळे आता येस बॅंक खातेधारकांना 50 हजारापेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही.