Tue. Nov 24th, 2020

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादवांसह त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा अडचणीत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा अडचणीत सापडले आहेत.

 

दिल्लीत लालू प्रसाद यादव यांची मुलगी आणि राज्यसभा खासदार मिसा भारती आणि जावई शैलेश यांच्या निवासस्थानी आणि कंपन्यांवर ईडीने छापा मारला आहे.

 

शनिवारी सकाळी ईडीने मिसा भारती आणि शैलेश यांच्या तीन ठिकाणांवर छापे मारले. यामध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाजवळील बिजवासन फार्महाऊसचाही

समावेश आहे.

 

त्याचबरोबर सैनिक फार्म आणि घिटोरनीचाही समावेश आहे. मनी लॉड्रिंगच्या या प्रकरणात मिसा आणि शैलश यांच्यावर 8 हजार कोटी रूपयांचा काळा पैसा पांढरा

केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून होणाऱ्या तपास संदर्भात ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *