Fri. Sep 25th, 2020

चंदा कोचर यांच्या 78 कोटींच्या संपत्तीवर ED ची जप्ती

ICICI बॅँकेच्या माजी MD चंदा कोचर यांच्यावर ED ने कायदेशीर कारवाई केली आहे. एकूण 78 कोटींची संपती EDने जप्त केली आहे. यात चंदा कोचर यांचा मुंबईतील फ्लॅट आणि त्याच्या नवऱ्याची संपत्ती यांचा समावेश आहे.

का आणली जप्ती?
चंदा कोचर यांनी पतीला फायदा मिळावा यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
ICICI बॅँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा फायदा घेऊन नियमांचं उल्लंघन केलं.
वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन (Videocon) कंपनीला 300 कोटींचं कर्ज दिलं होतं.
Videocon कंपनीने 86 % रक्कम चुकवली नव्हती.
या सर्व प्रकरणात चंदा कोचर यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्यात आली.

कोण आहेत चंदा कोचर?
चंदा कोचर या ICICI बॅँकेत MD म्हणून कार्यरत होत्या. फोर्ब्ज मॅगेझिनच्या जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत चंदा कोचर यांचा समावेश होता. ICICI बॅँकेत काम करत असताना गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *