Thu. Apr 22nd, 2021

55 वर्षांच्या संसारानंतर 80 वर्षीय वृध्दाचा घटस्फोटाचा दावा

पुण्यात एका 80 वर्षीय वृद्धाने  घेऊन घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे त्याचे म्हणणे आहे.पुण्यातील फॅमिली कोर्टात हा दावा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचे जून १९६४ मध्ये लग्न झाले आहे. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. संसाराला 55  वर्ष पूर्ण झाल्यानंतर 80 वर्षीय वृद्धाने आपल्या 75 वर्षीय पत्नीविरोधात असा दावा दाखल केला आहे.

हिंदू विवाह कायदा १९५५ चे कलम १३ (१) (आयए) नुसार  हा दावा  दाखल करण्यात आला आहे. काही दिवसं ती एका आजाराने त्रासलेली होती त्यामुळे ती चिडचिड करत असेल म्हणून पतीने तिचा त्रास सहन केल्याचं त्याने म्हटलं आहे.पण तिच्याकडून होणारा त्रास वाढल्याने घटस्फोटाचा दावा दाखल केला असल्याचे पत्नीने म्हटलं आहे.

घटस्फोटाचे नेमकं कारण काय ?

नात्यात कटुता आली असून पत्नीकडून मानसिक छळ  होत होता.

पतीच्या आरोग्याकडे पत्नीचे दुर्लक्ष  होत आहे.

पत्नीने पतीची फसवून करून सर्व संपत्ती ताब्यात घेतली आहे.

दोघांनी सुरू केलेल्या संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दे अशी पत्नीची मागणी होती.

या प्रकरणी गुंड बोलावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पतीने बांधलेला बंगलाही तिने तिच्या नावावर करून घेतला आहे. ‘

तुझी मला गरज नाही, तू निघून जा’, नाहीतर पोलीस केसमध्ये अडकवेन’ अशा  पत्नीच्या धमक्या देण.

किचनला मुद्दाम कुलूप लावून  निघून अर्जदाराला शुगर आणि हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना वे‌ळेवर जेवण आणि औषधे घ्यायची असतात.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *