Sat. Oct 24th, 2020

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; खडसे समर्थकांचा तीन दिवसाचा ब्लॅक-डे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळातील गच्छंतीला येत्या चार जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे.

 

गेल्यावर्षी मे महिन्यात खडसेंवर अनेक आरोप झाले होते. खडसेंच्या गच्छंतीनंतर भाजपात कार्यकर्त्यांचे दोन गट पडल्याचं चित्र दिवसेंदिवस गडद होत

चाललंय.

 

कोणत्याही पुराव्याशिवाय खडसेंवर निराधार आरोप केले असल्याचा दावा खडसे समर्थक करत आहेत.

 

या आरोपांचा निषेध म्हणून खडसेंच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवस ब्लॅक डे ची घोषणा केली.

 

टिम सपोर्ट एकनाथराव खडसे या नावाने सोशल मिडियावर खडसे समर्थक एकत्र आले आहेत. याप्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; खडसे समर्थकांचा तीन दिवसाचा ब्लॅक-डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *