Tue. Apr 20th, 2021

एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा

मुंबई :  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

आम्हाला जाणीवपूर्वक निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आले. याचाच फटका भाजपला बसला. आम्ही निवडणुकीच्या प्रचारात असतो तर नक्कीच भाजपच्या आणखी जागा वाढल्या असत्या, असे एकनाथ खडसे म्हणाले. 

काय म्हणाले एकनाथ खडसे ?

महायुतीला पूर्ण बहुमत होते. पण तरी सुद्धा महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही, याचं मला दु:ख वाटतयं. ज्यांनी ज्यांनी पक्षविस्तारासाठी काम केलं त्यांनाच बाजूला करण्यात आलं, त्यामुळे निवडणुकीवर परिणाम झाल्याचं खडसे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत ज्यांचे तिकीट कापलं गेलं, त्यांना निवडणुकीच्या वेळी सक्रीय केलं असतं तर आमदारांची संख्या 20-25 ने वाढली असती, असेही खडसे म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीत विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या भाजपच्या अनुभवी नेत्यांना तिकीट नाकारण्यात आलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *