राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी २६ मार्चला होणार निवडणूक

निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यसभेतील एकूण ५५ सदस्यांसाठी रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. ही द्विवार्षिक निवडणुकीसाठी २६ मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
एकूण १७ राज्यातील ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याबद्दलची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातल्या एकूण ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत आहे.
राज्यातील ७ खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजिद मेमन, हुसेन दलवाई, राजकुमार धूत, अमर साबळे आणि संजय काकडे यांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ७ पैकी ५ जागा महाविकास आघाडीच्या खिशात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
असा असेल कार्यक्रम
- ६ मार्चला राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार.
- उमेदवारी दाखल करण्याची १३ मार्च ही शेवटची तारीख असणार आहे.
- १८ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल.
दरम्यान राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तसेच राज्यसभेवर महाराष्ट्रातले एकूण १९ खासदार दिल्लीत नेतृत्व करतात.
राज्यसभा सभागृह कधीच विसर्जित होत नाही. राज्यसभेची एकूण २५० इतकी सदस्यसंख्या असते.