Sun. Jun 7th, 2020

राज्यात मतदान प्रक्रियेसाठी पोलीस सज्ज; निवडणूक आयोगाची जोरात तयारी

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असल्यामुळे मुंबई पोलीस सज्ज झाली आहेत. शहरात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शहरात ४० हजारहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी निवडणूक आयोगाची आणि मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. रत्नागिरीत विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी १२५० पोलीस कर्मचारी आणि राज्यातील इतर ६०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १३०० होमगार्ड आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या पाच तुकड्या तेनात केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात असलेले  पक्ष आणि जागा –

भाजप – १६४

शिवसेना – १२४

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया  – ८

मनसे – १०५

समाजवादी पार्टी – ७

स्वाभिमानी शेतकरी संघटना – ५

शेतकरी कामगार पक्ष (PWPI) – २३

काँग्रेस -१४७

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -१२१

वंचित बहुजन आघाडी -२३५

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (AIMIM) -४४

बहुजन विकास आघाडी – ३१

बहुजन समाज पार्टी -२६२

आम आदमी पार्टी -२४

इतर -१९३६

एकूण – ३२३७

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *