Mon. Dec 6th, 2021

‘ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोवर निवडणूक घेण्यात येऊ नये’ – आमदार जयकुमार रावल

धुळे: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोवर निवडणूक घेण्यात येऊ नये, या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. राज्य सरकार ठोस निर्णय घेऊन ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका घेऊ शकते, आता हे आरक्षण गेले तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ओबीसींवर अन्याय होणार आहे, त्यामुळे राज्य शासनाने योग्य तो निर्णय घेऊन पुन्हा ओबीसी आरक्षण मिळवून देण्याची मागणी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी केली. कोरोनाच्या महाप्रलयात एकीकडे राज्य सरकार कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा अटकाव करण्यासाठी नवे निर्बंध लावत आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोग निवडणुकांची तयारी करीत असल्याचा विरोधाभासही रावल यांनी या वेळी लक्षात आणून दिला. या निवडणुकांमुळे कोणालाही कोरोनाची लागण झाली अथवा कोणाचा मृत्यू झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असेल असा इशाराही रावल यांनी यावेळी दिला. त्यांच्यासोबत त्यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेऊन ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोवर निवडणुका घेण्यात येऊ नये अशी ठाम मागणी भाजपकडून यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *