Fri. May 14th, 2021

भिवंडी, मालेगाव, पनवेलमध्ये महानगरपालिकांचा महासंग्राम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भिवंडी, मालेगाव, पनवेलमध्ये महानगरपालिकेसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. तसेच धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद, नेवासा, रेणापूर शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुका आज पार पडत आहेत.

 

 

तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 026 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली.

 

 

आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात 2 हजार 291 कंट्रोल युनिट; तर 7 हजार 143 बॅलेट युनिटचा समावेश आहे.

 

भिवंडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, शिवसेना, भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मालेगावमध्ये काँग्रेस भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. पनवेलमध्ये महाआघाडी आणि भाजपमध्ये मुख्यत्वे ही लढत होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *