नागरिकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे लागणार- ऊर्जामंत्री
वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे.

वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.
वीज वापरणारे जसे ग्राहक आहेत तसे महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावा लागते, विविध चार्जेस द्यावे लागतात. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.