राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत राबविण्यात येत आहेत. इ.११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) प्रवेश फेरीमधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिली. कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
जाहीर वेळापत्रकानुसार दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी फेरी समाप्त झाले. तथापि असे निदर्शनास आले की, काही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करावयाचा आहे, तसेच काही विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी यापुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
या फेरी अंतर्गत दि. २१/१०/२०२९ रोजी दु. १२:०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. सायं. ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. वाढीव कालावधीमध्ये इ.१० वी उत्तीर्ण असलेले सर्व तसेच एटिकेटी (ATKT) विद्यार्थी पात्र असतील. इ. १०वी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे इ. ११वी प्रवेशाबाबत पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर निर्णय घेण्यात येईल.
एफसीएफसी (FCSC) फेरी सुरू असल्याने सर्व उत्तीर्ण तसेच एटिकेटी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे गुणपत्रिकेवर गुण अथवा श्रेणीही नमूद नसून केवळ पास असे नमूद असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण साठी किमान गुण (३५ टक्के प्रमाणे एकूण गुण गृहीत धरून) ऑनलाईन अर्ज भरावेत. अशा विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभागी होता येईल.
संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासोबत आज भेटीचा योग आला. नाहीतर मला सातारा, कोल्हापूरला जावे लागले असते. दोघांशी…
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं हा नवा कोरा मराठी चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित…
चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं…
नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्यापही झालेलं नाहीय. याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त…
जालना येथील या स्टील कंपनीला महावितरणकडून नियमबाह्य पद्धतीने अनुदान दिले जात असल्याची माहिती समोर आली…
komal mane गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युल स्टेशन या नावाने असलेल्या ऐसार कंपनीच्या पेट्रोल…