Thu. Dec 12th, 2019

एल्गार प्रकरणात अटक केलेल्या 5 जणांना आज कोर्टात हजर करणार

जय महाराष्ट्र वेब न्यूज, पुणे

पुण्यातील शनिवार वाडा परिसरात झालेल्या ‘एल्गार’ परिषदेनंतर शहरी नक्षलवादाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

एल्गार प्रकरणानंतर तपासण्यात आलेल्या ई-मेल्सच्या आधारावर कारवाई सुरु आहे. त्या अंतर्गत काल पुणे पोलिसांनी देशभरात मुंबई, दिल्ली, हरियाणा, रांची, हैदराबाद आणि गोव्यात काही जणांच्या घरांवर छापे घातले आहेत.

यामध्ये पुणे पोलिसांनी पी. वरावरा राव, मुंबईतून वर्नोन गोनसाल्वीस, आणि ठाण्यातून अरुण फरेरा, या तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना आज पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे.

तर गौतम नवलखा आणि सुधा भारद्वाज यांनाही दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं आहे.

मात्र त्यांची ट्रान्झिट कोठडी न मिळाल्यानं पुणे पोलिसांना अद्याप या दोघांना पुण्यात आणता आलेलं नाही. त्यावर आज दिल्लीच्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *