500 किलोंची इमान झाली अर्धी, आता अशी दिसते इमान
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जगातली सर्वाधिक लठ्ठ महिला इमाननं तब्बल अर्ध वजन घटवलं. इमानचं वजन आता 500 किलोवरून 250 किलो झालं आहे.
स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया, इतर उपचार, थेरपी आणि विशेष आहार या सगळ्याचा योग्य समन्वय साधून इमानचं वजन 250 किलोंवर आणण्यात डॉक्टरांना यश मिळालं.
250 किलो वजन झाल्यानंतर 18 एप्रिलला इमानचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यात इमान डॉक्टरांशी संवाद साधताना आणि व्हिलचेअरवर हॉस्पिटलची सैर करताना दिसते.