Sun. Jul 5th, 2020

कंत्राटदारांच्या पैशावर मौजमजा,जय महाराष्ट्रने केला उघड

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूर जिल्हा परिषदेतील कंत्राटदारांच्या पैशावर कर्मचारी मौज करताना दिसले. थायलंडला गेलेल्या त्या 22 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यापैकी 10 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. बांधकाम विभागातील हे कर्मचारी नातेवाईकांच्या लग्नासाठी सुट्टी हवी आहे हे कारण देत 21 ते 28 एप्रिल दरम्यान थायलंड यात्रेला गेले होते.

कंत्राटदारांच्या पैशावर मौजमजा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा प्रताप जय महाराष्ट्रनं चहाट्यावर आणल्यानंतर जिल्हापरिषदेनं ही कारवाई केलीय. यामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोन शिपायांसह मुख्य आरेखक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अधीक्षक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, आरेखक यांच्यासह रामटेक आणि मौदा उपविभागाचे दोन शाखा अभियंता तसेच सावनेर पंचायत समितीतील एका शाखाअभियंत्याचा समावेश आहे. दरम्यान या दौऱ्याचं आयोजन करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *