Tue. Nov 24th, 2020

काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था, काश्मीर

 

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. श्रीनगरमधल्या अनंतनागच्या वानी हमा गावात 3 दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आलं. या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशनंही राबवलं.

 

सुरक्षा जवानांना दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग येथील एका गावात दहशतवादी असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर जवानांनी पूर्ण परिसराला वेढा घातला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांची नावं साद, जिब्रान आणि नासिर अशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *