Wed. May 18th, 2022

मविआ सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर टांगती तलवार

महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या १०० कोटीवसुलीच्या बाबतीत ईडी ने चौकशीसाठी बोलविल होत, त्यांना अटक होण्याची शक्यता देखील आहे अश्यातच अनिल देशमुख यांच्या सोबतच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील मनीलोंड्रिंग केलं असून यात त्यांच्या स्वीय सहायकसह, नागपूर चे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त देखील सहभागी असल्याचा आरोप नागपूर मधील वकील तरुण परमार यांनी केला आहे, या संदर्भात परमार यांनी ईडी ला तक्रार दिल्यानंतर ईडी ने परमार यांच्याकडून माहिती देखील घेतली आहे, या संदर्भात महत्वाचे कागदपत्रे देखील सादर केली आहे, यापुढे ईडी आता या प्रकरणाची चौकशी करणार असेल तर नितीन राऊत यांच्या अडचणी वाढणार हे निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.