क्रिकेटपटू राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

क्रिकेटपटू राहुल अन् सुनील शेट्टीच्या लेकीचा ‘तो’ फोटो व्हायरल राहुल-अथिया यांच्या अफेअरची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा भारतीय क्रिकेटपटू लोकेश राहुल व बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी याची लेक अथिया हे अनेकदा एकत्र दिसतात. या दोघांच्या नात्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होतांना दिसतात. अद्याप दोघांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृतरीत्या कोणतीही स्पष्टता दिलेली नाही, पण त्यांचे आतापर्यंतचे फोटो पाहून त्यांचं नात ‘मैत्रीच्या पलीकडलं’ असल्याचं म्हटलं जात आहे आणि याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा ह्या सोशलमीडियावर होतांना दिसत आहे.
सध्या या राहुल आणि अथिया एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दोघांच नात हे मैत्रीच्या मैत्रीच्या पलीकडलंचं आहे, असं वर्तवल्या जात आहे. सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं आहे. राहुलचा आणि अथिया यांना एक हॉटेल लॉनवरील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघे डिनर करताना दिसत आहेत. राहुल आणि अथिया एकमेकांचे अगदी जवळचे मित्र आहेत. राहुल आणि अथिया यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. राहुल आणि अथिया अनेक वेळा एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसत असतात. दोघांनाही अनेक वेळा एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना स्पॉट झाले आहे.