PF काढण्याचा सोपा उपाय!

ईपीएफओ ( Employee’s Provident Fund Organisation) काढण्याची कटकट वाटतेय का? आता जास्त विचार करू नका, याचा फायदा करून घ्या. नोकरी बदलताना आधीचे फंड ट्रान्सफर केले जातात. यात आता EPFO काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचं दिसून आलंय.यातूनच पीएफ काढण्याच्या सोप्या प्रक्रियेची निर्मिती करण्यात आली आहे.
PF काढण्याची सोपी पद्धत
https:unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लॉग इन करा.
आधार बेस्ड ऑनलाइन क्लेम सबमिशन टॅब क्लिक करा.
KYC डिटेल्स व्हेरिफिकशन अपरिहार्य आहे.
क्लेमसाठी विविध पर्यांयापैकी ऑप्शन निवडा.
UIDAI डेटाबेसमध्ये नोंद असलेल्या फोन नंबरवर वन टाईम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
ईपीएफओतर्फे पाठवण्यात आलेल्या वन टाईम पासवर्ड टाइप केल्यावर क्लेम फॉर्म सादर होईल.
त्यानंतर PF प्रक्रिया सुरू होईल आणि तुमची रक्कम तुमच्या संबंधित खात्यावर जमा होईल.
या आवश्यक बाबींकडे लक्ष द्या:
- ऑनलाइन सेवा वापरताना ईपीएफओ प्रतिनिधीला तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही.
- यासाठी कंपनीचा एस्टॅब्लिशमेंट नंबर असणं गरजेचं आहे.
- ईपीएफओ मध्ये रजिस्टर्ड असणारा आणि तुमचा फोन नंबर एकच असणं आवश्यक आहे.
- ईपीएफओ खातेधारकांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर दिला जाईल.
- पीएफमधील पैसे काढेपर्यंत नंबर निष्क्रिय होणार नाही.
- यासाठी ईपीएफओ आणि आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे
- लिंक केलेलं असल्यास पूर्ण प्रक्रिया 3 ते 4 दिवसांमध्ये शक्य आहे.