Wed. Apr 21st, 2021

अखेर MIM चा आणि वंचितचा तलाक!

लोकसभा निवडणुकीत महायुती, महाआघाडीनंतर जन्माला आलेली वंचित बहुजन आघाडी आणि MIM ची आघाडी चांगलीच चर्चेत आली होती. या तिसऱ्या आघाडीने मातब्बर पक्षांची चांगलीच धांदल उडवली होती. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पाहायला मिळाला. मात्र राज्यातील याच तिसऱ्या आघाडीमध्ये तलाक झाल्याचं खा.इम्तियाज जलील यांनी प्रसिद्ध पत्रक काढून जाहीर केलंय.

MIM चे प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील यांनी तलाक घेतल्याची घोषणा केली खरी, मात्र त्याला वंचितचे प्रमुख डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी हा तलाक झालाच नसल्याचं उलटं वक्तव्य केलंय. शेवटी औरंगाबादनंतर हैद्राबादतूनही तलाक घेतल्याचं MIMचे अध्यक्ष असोद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलं. यातूनच वंचित आणि MIM मध्येच आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय.

लोकसभा निवडणुकीत जन्माला आलेल्या वंचित बहुजन आघाडीचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पाहायला मिळाला होता.

शिवसेनेला आपला बालेकिल्ला अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला तर काँग्रेसला ही नांदेड, हिंगोली हे गड गमवावे लागले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित व एमआयएममध्ये तलाक झाल्याने पुन्हा राजकीय समीकरण बदलणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची शिवसेनेची हक्काची जागा दलित व मुस्लिम मताच्या जोरावर MIMने मिळवली. तर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 9 जगावर फटका बसला.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आणि MIM मध्ये तलाक झाल्याने दलित आणि मुस्लिम मतदार असणाऱ्या 30 ते 35 मतदारसंघात पुन्हा राजकीय समीकरण बदलणार आहे. MIM ने आपले तीन उमेदवार जाहीर करून आंबेडकरांची नीती वापरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे वंचित आणि MIM एकत्र येणार का, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *