Tue. Sep 28th, 2021

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या समर्थनात पहिला पती राजा चौधरी

अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. पती अभिनव शुक्लाने श्वेतावर गंभीर आरोप केले आहे. श्वेता आणि अभिनव सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप करत आहेत. अभिनव म्हणतो की, श्वेता त्याला आपल्या मुलास भेटू देत नाही. शिवाय ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये सहभागी होण्यासाठी केपटाऊनमध्ये गेली होती आणि तिने मुलाला मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले होते. आपल्या मुलाला भेटण्यासाठी तो अनेक हॉटेल फिरत असल्याचं देखील त्याने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. आता याप्रकरणावर श्वेताचा पहिला पती राजा चौधरीने भाष्य केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत करताना राजाने म्हटले आहे की, जर तिचे दोन्ही विवाह टिकले नाहीत, तर याचा अर्थ असा नाही की ती एक वाईट व्यक्ती आहे. तो म्हणाला, श्वेता चांगली पत्नी आणि एक चांगली आई आहे.

राजा चौधरी पुढे म्हणाला, श्वेताच्या आयुष्यात हे पुन्हा घडत आहे, त्यामुळे तिच्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यात श्वेताचे दुर्दैव आहे की, तिच्याबरोबर सर्व काही पुन्हा एकदा घडत आहे आणि तिचे दुसरे लग्न टिकले नाही, याचा अर्थ असा नाही की ती एक वाईट व्यक्ती आहे. श्वेताने अभिनवला आपल्या मुलाला भेटायला द्यावे, असेही राजा म्हणाला. मला यावर भाष्य करण्याची इच्छा नाही, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की वडिलांना मुलास भेटण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना हे समजले पाहिजे की जोडपे म्हणून त्यांच्या नात्यात बऱ्याच समस्या उद्भवू शकतात, पण वडील आपल्या मुलाला कधीही इजा करु शकत नाहीत. मी त्यांच्यात जे काही घडत आहे, त्यात मधे पडू इच्छित नाही. श्वेताचे पहिले लग्नही फार काळ टिकले नव्हते. 2007 मध्ये ती पती राजा चौधरीपासून विभक्त झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *