Sat. Sep 18th, 2021

हिटमॅन रोहितचं पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहित शर्माने टीममध्ये कमबॅक केलं आहे. रोहित शर्माने 2019 या वर्षात क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

रोहित शर्माचं पाकिस्ताच्या माजी क्रिकेटपटूने कौतुक केलं आहे.

पकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी रोहित शर्माचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाले झहीर अब्बास ?

रोहित शर्मा जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येतो, तेव्हा मी टीव्ही स्क्रीन समोरुन उठत नाही. रोहितची बॅटिंग पाहायला मला आवडतं, अशा शब्दात झहीर अब्बास यांनी रोहितचे कौतुक केलं.

रोहित शर्मा निर्णायक क्षणी मोठे फटके लगावतो. रोहितचं शॉर्ट सेलेक्शन देखील भन्नाट आहे.

बॉलचा टप्पा देखील त्याला नेमका समजतो, असंही झहीर अब्बास म्हणाले. झहीर अब्बास यांनी एका मुलाखतीत रोहितचं कौतुक केलं.

रोहित शर्माने श्रीलंका विरुद्धच्या सीरिजसाठी विश्रांती घेतली होती.

दरम्यान रोहित शर्माची आगामी न्यूझीलंड दौऱ्यावरील टी-20 सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे.

अधिक वाचा : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *